शहर LIVE शिरुर आता शिरुरसाठी सेवकाच्या भूमिकेत येतोय!
शिरुर,दिनांक ७ सप्टेंबर २०२५ |प्रतिनिधी |
” शहर LIVE – शिरुर शहरातील ताज्या घडामोडी, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम व नागरिकांच्या समस्यांवरील बातम्या व विश्लेषण.”
प्रस्तावना—-
गावाकडून शहरांकडे होणारी झपाट्याने होणारी स्थलांतर प्रक्रिया, आधुनिक सोयीसुविधा आणि वाढती लोकसंख्या यामुळे तालुका पातळीवरची शहरे ही जिल्हा पातळीवरील शहरांशी स्पर्धा करु लागली आहेत.शिरुर करांना आता पुणे किंवा अहिल्यानगरला फारसे जावे लागत नाही.अगदी कालचा ‘गणेशोत्सव’ इतका टोलेजंग दिसला की आता पुणे येधील ‘गणपती’ देखावे पाहायला जावु लागेल असे वाटत नाही.असो ही तालुक्याची शहरे आजच्या भारताच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक केंद्रबिंदू बनली आहेत.एकुण लोकसंख्या पाहता ‘अशा’ विकेंदीकरणाची गरज आहेच. पुणे जिल्ह्यातील शिरुरसारख्या शहरांमध्येही मोठा बदल घडतो आहे. “शहर LIVE” या विभागातून वाचकांना आपल्या शहराशी संबंधित ताज्या घडामोडी, सुविधा, समस्या तसेच विकासाच्या दिशा जाणून घेण्याची संधी मिळेल.
शहर LIVE मध्ये काय असेल?—
1. वाहतूक व पायाभूत सुविधा – रस्ते, पूल, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग समस्या,वीज,पाणी इ.समस्या मांडल्या जातील.
2. शहर स्वच्छता व आरोग्य – कचरा व्यवस्थापन, रुग्णालये, आरोग्य सुविधा.गटारे,दुर्गंधी,रोगराई तसेच ससुनच्या धर्तीवर एक मोठे सर्वोपचारव मोफत सरकारी दवाखाण्यासाठी जनमत तयार करण्याचे काम ,’शिरुर न्युज’ च्या माध्यमातुन सुरू केले आहे.लोकप्रतिनिधींनी हे खासकरुन लक्षात घ्यावे.
3. शिक्षण व करिअर – शाळा, महाविद्यालये, स्पर्धा परीक्षा व प्रशिक्षण केंद्र.तांत्रिक प्रशिक्षण केंद्र, मेडिकल कॉलेज शिरुरमधे व्हावे यासाठी जनमत तयार केले जाणार आहे.एक सरकारी, ‘एक्टींग स्कूल पुणे विद्यापीठाप्रमाणे शिरर मधे सुरु होणे गरजेचे आहे.बालगंधर्व रंगमंदीर,पुणे सारखे एक बारमाही कलादालन शिरुर मधे असावे.राजा केळकर वस्तुसंग्रहालय,पुणे सारखे एक पुरातत्वीय,दुर्मिळ वस्तुंचे दालनही असावे.असे आम्हाला वाटते.
4. सांस्कृतिक घडामोडी – उत्सव, नाट्य, संगीत, क्रीडा स्पर्धा यांना प्रोत्साहित केले जाईल.विविधता हीच भारतीय समाज व संस्कृती टिकून राहण्याचे कारण आहे.त्यात उदारमतवादी सांस्कृतिक ऐक्य गरजेचे आहे.कट्टरता व राजकीय अभिनिवेश विहीन सहजीवन इथे नांदावे.असे आम्हाला वाटते.
5. व्यापार व उद्योग – स्थानिक बाजारपेठ, रोजगार संधी, स्टार्टअप्स,छोटी छोटी विखुरलेली मार्केटस् उपयुक्त व अर्थकारणाचे विकेंदीकरणासाठी गरजेचे असते.त्यासाठी मांडणी व मागणी ,’शिरुर न्युज ‘ मधून सातत्याने केली जाईल.
6. शासन योजना व स्थानिक प्रशासन – महापालिका/नगरपालिका निर्णय, नागरिकांसाठी उपक्रम,योजना, त्यांची पारदर्शक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.विविध कार्यालयातील वशिलेबाजी,चिरीमिरीसाठी अडवणुक,दलाली इ.विरुद्ध आवाज, ‘शिरुर न्युज ‘मधून जरूर उठवला जाईल.
7. नागरिकांचा आवाज – शहरातील समस्या, सुचना व उपाय इ.अनेक बाबतीत निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग व आवाज प्रभावी असणे गरजेचे असते.त्यासाठी ‘शिरुर न्युज ‘कडे नागरिकांनी व्यक्त व्हावे,असे आवाहनही आम्ही करत आहोत.
शहरीकरणाचा शिरुरवरील परिणाम••••••
• लोकसंख्यावाढ – ग्रामीण भागातून स्थलांतरामुळे शहराचा विस्तार.
• वाहतूक कोंडी – रस्त्यांवरील वाहनसंख्या झपाट्याने वाढली.
• घरबांधणी व भाडेवाढ – घरांच्या मागणीमुळे रिअल इस्टेट क्षेत्र गतीमान.
• शैक्षणिक संधी – शहरात नवीन शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेस.
• रोजगार निर्मिती – MIDC व IT कंपन्यांमुळे वाढलेले रोजगार.
शहरातील नागरिकांच्या समस्या—
• रस्त्यांची दुरवस्था व वाहतूककोंडी
• कचरा व्यवस्थापनातील त्रुटी
• पाणीपुरवठ्याचा प्रश्न
• वाढते प्रदूषण
• आरोग्य व रुग्णालयांची अपुरी सोय
उपाय आणि संधी—
• स्मार्ट सिटी संकल्पना – आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा.
शहर फक्त रस्ते आणि इमारती नाही, तर सांस्कृतिक उर्जा देखील आहे. गणेशोत्सव, दहीहंडी, नाट्य प्रयोग, क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक चळवळी यामुळे शहर सतत धडधडत असते. “शहर LIVE” वाचकांना या सांस्कृतिक हालचालींची माहिती देईल.
“शहर LIVE” हा विभाग म्हणजे नागरिकांना आपल्या शहराचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न आहे. येथे फक्त समस्या नव्हे तर संधी, सकारात्मक उपक्रम आणि नागरिकांचा सहभाग यावरही लक्ष असेल. शहराचा विकास म्हणजे केवळ इमारती नव्हे, तर सजग, सक्रिय व प्रगत नागरिकांची बांधणी हे या कॅटेगरीचे ब्रीद आहे.
‘शिरुर न्युज’ शी २४ तास ,कधीही संपर्क करा व आमच्या व्हाट्सअप ग्रुप मधे सहभागी व्हा.नंबर: 7776033958,माहिती,फोटो,व्हिडिओ, बातम्या पाठवा.नाव गुप्त राहिल.आजपर्यंत कधी आम्ही ते घडू दिले नाही.याचा अनुवाद अनेकांना आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com
[…] शहर LIVE :शिरुर , बदलत्या शहरी जीवनाचा आरस… […]
[…] शहर LIVE :शिरुर , बदलत्या शहरी जीवनाचा आरस… […]