Contents
शिरूर तालुक्यात चांडोह गावातून 58,750 रुपयांच्या विजेच्या केबल चोरी
विजेची केबल चोरी घटना!
शिरूर,दिनांक १ सप्टेंबर २०२५ |प्रतिनिधी|
शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा चोरीची घटना घडली आहे. मौजे चांडोह गावच्या हद्दीत घोडनदीच्या कडेला ठेवलेल्या पॉलीकॅप कंपनीच्या विजेच्या केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोऱ्येमध्ये एकूण ₹58,750/- किंमतीचा माल लंपास झाला आहे.
घटनेची माहिती—-
• गुन्हा दाखल क्रमांक : 630/2025, भा.न्या.सं. 303(2)
• फिर्यादी : सचिन भिकाजी विधाटे (वय 40, व्यवसाय शेती, रा. चांडोह, ता. शिरूर, जि. पुणे
• घटनेची वेळ : 31 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 2.00 वा. ते सकाळी 8.30 वा.
• गुन्हा नोंदविण्याची वेळ : 31 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 11.37 वा.
• आरोपी : अज्ञात
चोरीस गेलेला माल—-
1. सचिन विधाटे यांची 100 मीटर केबल – किंमत ₹5,000
2. दशरथ होणाजी जाधव यांची 375 मीटर केबल – किंमत ₹18,750
3. कुंडलीक दगडु भाकरे यांची 300 मीटर केबल – किंमत ₹15,000
4. घोंडीभाऊ नामदेव वळसे यांची 200 मीटर केबल – किंमत ₹10,000
5. भानुदास नामदेव वळसे यांची 200 मीटर केबल – किंमत ₹10,000
➡️ एकूण चोरीस गेलेला माल : ₹58,750
तपास व पुढील कार्यवाही—
दाखल अंमलदार : पो. हवा. खेडकर
तपास अधिकारी : पो. हवा. बनकर
प्रभारी अधिकारी : संदेश केंजळे (सो.), शिरूर पोलीस स्टेशन
या घटनेत अज्ञात चोरट्याने आर्थिक फायद्यासाठी मुद्दाम लबाडीच्या हेतूने चोरी केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
नागरिकांमध्ये भीती—-
गेल्या काही दिवसांत शिरूर तालुका परिसरात केबल व शेतीसंबंधित साहित्य चोरीच्या घटना वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपी लवकरच पकडला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
📰अधिक बातम्या व पार्श्वभूमीसंदर्भासाठी पुढील लिंकवर क्लिक करा •••
🚨 कायदेशीर व पोलिस माहिती•••
Maharashtra Police – Official Website
National Crime Records Bureau (NCRB)
Indian Penal Code (IPC / BNS Sections)
शिरुर न्युज च्या आणखीन बातम्या व माहिती वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन••••
शिरूर पोलिसांची धडक कारवाई : तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे व मोटारसायकल जप्त !
१५ ऑगस्ट २०२५ : स्वातंत्र्यदिन, इतिहासापासून उद्याच्या भारतापर्यंत !
CSR फंड व NPOs : ग्रामीण विकासासाठी नवा श्वास