ओन्ली वुमन्स जिम – शिरुर शहरातील महिलांसाठी आरोग्य व सौंदर्याची नवी दिशा !

ओन्ली वुमन्स जिम पुन्हा जोमात सुरु !

“ओन्ली वुमन्स जिम” – शिरुर शहरातील महिलांसाठी खास सुसज्ज जिम. झुंबा फिटनेस डान्स, एरोबिक्स, योगा, स्टिम बाथ आणि तज्ञांचे मार्गदर्शन. ‘स्रीचे आरोग्य ठिक तर कुटुंबाचे आरोग्य ठिक’ या संकल्पनेतून महिलांच्या आरोग्याची आणि सौंदर्याची नवी दिशा.

प्रस्तावना—

आजच्या गतिमान जीवनात महिलांवर अनेक जबाबदाऱ्या असतात हे खरे आहे. कुटुंब, नोकरी, सामाजिक आयुष्य, मुलांची देखभाल… या सगळ्या गडबडीत “स्वतःसाठी वेळ काढणे” हे महिलांना कठीण बनते. पण एक गोष्ट मात्र सत्य आहे ! महिलेचे आरोग्य ठिक असेल, तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य ठिक राहत असते.

या महत्वाच्या संकल्पनेला मूर्त रूप देत २०१६ मध्ये शिरुर शहरात सुरु झाले “ओन्ली वुमन्स जिम” ! हे आज शिरुर मधे प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी ठिकाण ठरले आहे.

जिमची सुरुवात आणि सौ.प्रिया बिरादार मॅडम यांचे योगदान—–

ओन्ली वुमन्स जिम
सौ.प्रिया बिरादार व त्याच्या सहकारी!

• या जिमच्या संस्थापिका सौ. प्रिया बिरादार मॅडम या आहेत. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून आणि महिलांच्या गरजांचा बारकाईने अभ्यास करून हे जिम ‘ओन्ली वूमन्स जीम’  उभे केले.

• त्यांना नेहमी वाटायचे की महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा असायला पाहिजे. जिथे त्या मुक्तपणे व्यायाम करू शकतील.

• पारंपरिक जिममध्ये महिलांना अस्वस्थ वाटत होते. पण येथे मात्र त्या निश्चिंतपणे ‘फिटनेस’कडे लक्ष केंद्रित करू शकतात.

• आज “ओन्ली वुमन्स जिम” हे नाव शिरुर शहरातील महिलांसाठी एक विश्वासार्ह ‘ब्रँड’ बनले आहे.

जिमची वैशिष्ट्ये—

'ओन्ली वूमन जीम'
मुलींना व्यायाम शिकवताना सौ.प्रिया बिरादार मॅडम.

१. फक्त महिलांसाठी खास जिम – पुरुषांचा येथे प्रवेश नाही. त्यामुळे महिलांना आत्मविश्वासाने व्यायाम करता येतो.
२. झुंबा फिटनेस डान्स – म्युझिकच्या तालावर व्यायाम, मजा व फिटनेस यांचा संगम साधला जातो.
३. एरोबिक्स – हृदयासाठी उपयुक्त, लवचिकता वाढवणारा हा व्यायाम प्रकार सौ.प्रिया बिरादार घेतात.
४. योगा सेशन्स – शरीर आणि मनाचे संतुलन राखण्यासाठी ‘योगा’ देखील येथे तंत्रशुद्ध पद्धतीने मॅडम घेतात.
५. स्टिम बाथ विभाग – शरीरातील घाण, टॉक्सिन्स काढून टाकण्यासाठी व त्वचेची कोमलता वाढवण्यासाठी ही पद्धत या जिमचे खास वैशिष्ट्य आहे.
६. तज्ञांचे मार्गदर्शन – नियमितपणे आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ, डॉक्टर, ब्यूटी एक्सपर्ट यांचे मार्गदर्शन येथे घेतले जाते.
७. लवचिक वेळा – सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत गृहिणी, विद्यार्थीनी, नोकरी करणाऱ्या महिला सर्वांसाठी योग्य वेळ व सोईची वेळ उपलब्ध आहे.
८. सुसज्ज उपकरणे – आधुनिक व सुरक्षित व्यायाम साधने येथे उपलब्ध करण्यात आलेली आहेत.
९. योग्य आहार मार्गदर्शन – डाएट चार्ट, हेल्दी फूड गाईड अशा आहारविषयक बाबींचे मार्गदर्शन येथे केले जाते.
१०. आरोग्यदायी व आत्मीय वातावरण – घरगुती जिव्हाळ्याचा अनुभव देणारे हे ठिकाण ठरले आहे.

शिरुर शहरातील अन्य शाखा—-

 ओन्ली वुमन्स जिम
ओन्ली वुमन्स जिम, शिरुर

शिरुर शहरात महिलांना सहज पोहोचता यावे यासाठी तीन प्रमुख शाखा शिरुर मधे उपलब्ध आहेत  –

1. शिक्षक कॉलनी,रामलिंग रोड,शिरुर.

2. इंदिरा गांधी पुतळ्यासमोर, दौलत चेंबर,शिरुर.

3. सुमनगंध निवास, टावर लाईन, डेक्कन स्कूलजवळ, बाबुराव नगर,शिरुर.

प्रत्येक शाखेत एकसमान सुविधा उपलब्ध आहेत.

महिलांचे आरोग्य का महत्त्वाचे?—-

• “महिला आरोग्य ठिक = कुटुंबाचे आरोग्य ठिक” या तत्वावर या जिमची उभारणी झाली आहे.

• स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ आहे.

• तिचा शारीरिक व मानसिक ताण कमी झाला तर ती उत्साहाने कुटुंब सांभाळू शकते.

योग्य व्यायाम आणि आहारामुळे ती दीर्घकाळ तंदुरुस्त राहते.

झुंबा, एरोबिक्स व योगाचे फायदे—

झुंबा:पद्धतीत कॅलरीज बर्न होतात.मजा येते. आत्मविश्वास वाढतो.

एरोबिक्स: हृदयाचे आरोग्य सुधारते. वजन नियंत्रणात राहते.

योगा: मन शांत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लवचिकता येते.

स्टिम बाथचे फायदे—-

त्वचा ताजीतवानी व उजळ होते.

श्वसनसंस्थेवर चांगला परिणाम होतो.

• शरीरातील घामातून विषारी घटक बाहेर टाकले जातात.

वेळापत्रक

सकाळी : पहाटे ५ ते ११

दुपारी : १२ ते ४

संध्याकाळी : ५ ते रात्री ८

या वेळेमुळे कोणत्याही महिलेचा दैनंदिन कार्यक्रम बिघडत नाही.

अनुभवकथन—

सौ. स्वाती पाटील (गृहिणी):

“मला पूर्वी व्यायामासाठी वेळ मिळत नव्हता. पण ओन्ली वुमन्स जिममुळे मला दररोज झुंबा करण्याची मजा मिळते. आता माझे वजन कमी झाले आहे आणि आत्मविश्वास वाढला आहे.”

कुमारी पूजा शिंदे (विद्यार्थिनी):

“परीक्षेच्या तयारीदरम्यान ताण कमी करण्यासाठी योगाचा खूप फायदा झाला. इथे येऊन मला मानसिक शांतता मिळते.”

सौ. गीता काकडे (नोकरी करणारी महिला):

“माझ्यासाठी संध्याकाळचा वेळ योग्य असतो. ऑफिसनंतर इथे येऊन व्यायाम केल्यावर थकवा नाहीसा होतो.”

👉 “स्रीचे आरोग्य ठिक – कुटुंबाचे आरोग्य ठिक”

संपर्क—-

📍 शाखा: शिक्षक कॉलनी / दौलत चेंबर, इंदिरा गांधी पुतळ्यासमोर / सुमनगंध निवास, टावर लाईन, डेक्कन स्कूलजवळ, बाबुराव नगर
📞 फोन नंबर:98222 43131
वेळ: पहाटे ५ ते रात्री ८

विश्वासार्ह संदर्भासाठी व माहिती पुढील लिंक्सवर क्लिक करा•••••

1. योगाचे फायदे (Ministry of AYUSH, India):
🔗 https://www.ayush.gov.in/yoga

2. झुंबा डान्स हेल्थ बेनिफिट्स (Healthline):
🔗 https://www.healthline.com/health/fitness-exercise/zumba

3. एरोबिक्स व्यायामाचे फायदे (Verywell Fit):
🔗 https://www.verywellfit.com/what-is-aerobics-1231045

4. महिलांचे आरोग्य (WHO Women’s Health):
🔗 https://www.who.int/health-topics/women-s-health

5. Steam Bath Benefits (Medical News Today):
🔗 https://www.medicalnewstoday.com/articles/steam-room-benefits 

‘शिरुर न्युज’ च्या आणखीन बातम्या  व लेख वाचा खालील लिंक्सवर क्लिक करुन••••

गणेशोत्सव निमित्ताने शिरूर शहरात साकारली आई तुळजाभवानी मातेची हुबेहूब प्रतिकृती !

बेलापूर फॉरेस्ट हिल सोसायटीत ७९ वा स्वातंत्र्य दिन: ऐक्य, उत्साह आणि देशभक्तीचा जल्लोष !

१५ ऑगस्ट २०२५ : स्वातंत्र्यदिन, इतिहासापासून उद्याच्या भारतापर्यंत !

About The Author

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management) पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते. शिरूर (पुणे) येथील रहिवासी. सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत. 📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com

2 thoughts on “ओन्ली वुमन्स जिम – शिरुर शहरातील महिलांसाठी आरोग्य व सौंदर्याची नवी दिशा !”

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत