Contents
पाबळ फाटा येथून दुचाकी चोरीला !
पाबळ फाटा परिसर चोरट्यांसाठी बनतोय नवीन साफ्ट टार्गेट?
शिरूर, दि. ९ सप्टेंबर २०२५|प्रतिनिधी|
शिरूर तालुक्यातील पाबळ फाटा परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाबळ फाटा नवे टार्गेट? —-
फिर्यादी अनिल बबन चव्हाण ,वय २५ वर्षे , राहणार,कारेगाव, तालुका-शिरूर, जिल्हा- पुणे, मुळगाव – बोरखडी, तालुका- शेनगाव, जिल्हा – हिंगोली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ७ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजेपर्यंतच्या दरम्यान पाबळ फाटा येथील रामलिंग रोडवर असलेल्या पानशॉप समोर त्यांची वापरात असलेली दुचाकी पार्क करून ठेवली होती.
मोटरसायकल हेरली व लंपास केली !—
दरम्यान अज्ञात इसमाने हँडल लॉक तोडून सदर मोटारसायकल चोरून नेली. चोरीस गेलेली दुचाकी ही यमाहा एस.झेड.आर (क्रमांक MH-12 HR-6562), लाल रंगाची व ग्रे पट्ट्याची आहे. तिची किंमत अंदाजे २०,००० रुपये एवढी आहे. सदर वाहनाचे मालक ज्ञानेश्वर खंडू धडे ,राहणार – कोळवण, तालुका- मुळशी, जिल्हा – पुणे हे आहेत.
शिरूर पोलीस करत आहेत पुढील तपास —–
या घटनेनंतर अनिल चव्हाण यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस हवालदार जगताप हे पुढील तपास करीत आहेत. दाखल अंमलदार पोलीस हवालदार आगलावे हे आहेत.प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुढील तपास सुरू आहे.
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या—
महाराष्ट्र पोलीस संकेतस्थळ
शिरुर न्युज च्या आणखीन बातम्या व लेखा वाचा खालील लिंक्सवर क्लिक करा••••
ओन्ली वुमन्स जिम – शिरुर शहरातील महिलांसाठी आरोग्य व सौंदर्याची नवी दिशा !
गणेशोत्सव निमित्ताने शिरूर शहरात साकारली आई तुळजाभवानी मातेची हुबेहूब प्रतिकृती !
बेलापूर फॉरेस्ट हिल सोसायटीत ७९ वा स्वातंत्र्य दिन: ऐक्य, उत्साह आणि देशभक्तीचा जल्लोष !