गणेशोत्सव निमित्ताने शिरूर शहरात साकारली आई तुळजाभवानी मातेची हुबेहूब प्रतिकृती !

शिरूर गणेशोत्सव देखावा बातमी

शिरूर,दिनांक १ सप्टेंबर २०२५ | प्रतिनिधी |

शिरूर शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू असून घरगुती व सार्वजनिक गणपतीसमोर आकर्षक सजावटीचे देखावे उभारले जात आहेत. यावर्षी जोशीवाडी येथील निशांत भवर या तरुणाने आपल्या घरच्या गणपतीसमोर तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.

निशांत भवर याने सांगितले की, “दरवर्षी वेगवेगळे देखावे साकारतो. मागील वर्षीच ठरवले होते की आई तुळजाभवानीचा देखावा करायचा. जवळपास 15 ते 20 दिवस मेहनत घेऊन हा देखावा तयार केला. देवीचा मुखवटा वगळता संपूर्ण साज, प्रभावळ व इतर साहित्य घरीच तयार केले.”

या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या अंगावरील साडी नेसविण्याची कठीण प्रक्रिया निशांतने यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे प्रतिकृती तुळजापूरच्या मूर्तीप्रमाणेच डोळे भरून पाहण्यासारखी झाली आहे.

निशांत भवरने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श ठेवत शाडूमातीच्या गणपतीची मूर्ती स्थापित केली आहे. या देखाव्याच्या निर्मितीसाठी निशांतच्या वडील अमृत भवर, आई मनीषा भवर, भाऊ अक्षय भवर, वहिनी शितल भवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला हा देखावा शहरभर चर्चेचा विषय ठरला आहे.

अधिक महत्वाची माहिती वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन•••• 

🟢 

तुळजाभवानी देवी बद्दल माहिती (Maharashtra Tourism)

गणेशोत्सवाची पारंपरिक माहिती

शाडू मातीच्या मूर्तींचे महत्त्व

शिरुर न्युज च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन•••• 

बेलापूर फॉरेस्ट हिल सोसायटीत ७९ वा स्वातंत्र्य दिन: ऐक्य, उत्साह आणि देशभक्तीचा जल्लोष !

तुमची समस्या LIVE : लोकशाहीत जनतेचा आवाज

शिरूर पोलिसांची धडक कारवाई : तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे व मोटारसायकल जप्त ! 

About The Author

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management) पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते. शिरूर (पुणे) येथील रहिवासी. सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत. 📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com

3 thoughts on “गणेशोत्सव निमित्ताने शिरूर शहरात साकारली आई तुळजाभवानी मातेची हुबेहूब प्रतिकृती !”

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत