🔴 शिरूर : 24 वर्षीय तरुणी बेपत्ता, शिरूर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद

शिरूर, दिनांक 7 जानेवारी 2026|प्रतिनिधी|

” शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील 24 वर्षीय तरुणी मेधा गर्व्हनर काळे हि 24 डिसेंबर 2025 रोजी दुपारी घरातून निघून गेल्यापासून बेपत्ता आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात मानव मिसिंग रजिस्टर नंबर 02/2026 अंतर्गत नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मेधा काळे हिच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही बातमी शिरूर, सरदवाडी व पुणे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाची असून जनतेच्या सहकार्याची आवश्यकता आहे.”

सरदवाडी (ता. शिरूर) येथील 24 वर्षीय तरुणी मेधा गर्व्हनर काळे हि 24 डिसेंबर 2025 रोजी दुपारी घरातून निघून गेल्यापासून बेपत्ता असून, याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे मानव मिसिंग रजिस्टर नंबर 02/2026 अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी जया गर्व्हनर काळे (वय 50, व्यवसाय गृहिणी, रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी खबर दिली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 9561665074 असा आहे. दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास मेधा काळे हि आपल्या राहत्या घरातून कोठेतरी निघून गेली. नातेवाईक, ओळखीच्या व्यक्ती व आसपासच्या परिसरात शोध घेऊनही तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.52 वाजता (स्टेशन डायरी क्रमांक 45) शिरूर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली.

बेपत्ता तरुणी मेधा गर्व्हनर काळे हिचे वय 24 वर्षे असून ती सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे येथील रहिवासी आहे. तिची उंची सुमारे 5 फूट 5½ इंच असून रंगाने गोरी व अंगाने सडपातळ आहे. चेहरा गोल असून डोळे घारे आहेत. उजव्या डोळ्याच्या भुवईवर तीळ हे तिचे विशेष ओळख चिन्ह आहे. ती मराठी (पारधी) भाषा बोलते. बेपत्ता होताना तिने चॉकलेटी रंगाचे जर्किन, जांभळ्या रंगाचा टॉप व लाल रंगाची लेगिंग परिधान केली होती. नाकात बारीक सोन्याची नथ, कानात सोन्याचे रिंगा, डाव्या हातात काळा स्बर, पायात चांदीचे पैंजण व पांढऱ्या रंगाची चप्पल असा तिचा पोशाख होता.

मेधा काळे हिच्याजवळ ओपो कंपनीचा अँड्रॉईड मोबाईल असून त्यामध्ये जिओ कंपनीचे सिमकार्ड आहे. सदर मोबाईलचा क्रमांक 9307207057 असा आहे. तक्रारदार आई जया काळे यांनी दिलेल्या जबाबानुसार, त्यांची मुलगी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली असून तिचा शोध घेऊन पुढील योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

या प्रकरणी पोहवा आगलावे  यांनी दाखल अंमलदार म्हणून तर पोहया कळमकर यांनी तपास अंमलदार म्हणून काम पाहिले आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मेधा गर्व्हनर काळे हिच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तात्काळ शिरूर पोलीस ठाण्याशी किंवा दिलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

🔗 शिरूर पोलीस स्टेशन संपर्क माहिती (Justdial)
📍 शिरूर पोलीस स्टेशन पत्ता व फोन नंबर (मोकळी माहिती) सिरूर पोलीस स्टेशन – संपर्क व ठिकाण (Justdial)
🔗 महाराष्ट्र पोलीस मुख्य पोर्टल
📍 महाराष्ट्र राज्य पोलीस अधिकृत वेबसाइट – विविध सेवा / संपर्क माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिकृत वेबसाईट
🔗 Maharashtra Dial112 पोर्टल – Missing Person सूचना
📍 मिसिंग व्यक्तीच्या त्वरित मदतीसाठी 112 कॉल सूचना व मार्गदर्शन माहिती Dial112 महाराष्ट्र पोलीस – Missing Person सूचना
🔗 पुणे ग्रामीण पोलीस – हेल्पलाइन नंबर
📍 आपत्कालीन पोलीस संपर्क (फूटकर परिस्थितीत 112/100 वापरा) व नियंत्रण कक्ष माहिती मिळवण्यासाठी (पुणे ग्रामीण पोलीस अधिकृत) पुणे ग्रामीण पोलीस – अधिक संपर्क माहिती
💡 त्वरित मदत: भारतात एखादी व्यक्ती गंभीरपणे हरवली असेल किंवा सुरक्षिततेची चिंता असेल तर डायल 112 किंवा 100 वर तात्काळ कॉल करा (पोलिस कंट्रोल रूम). �

Read more >>>>

शिरूरमध्ये अमोल ज्वेलर्सवर मोठा दरोडा : १ कोटी ३८ लाखांचा मुद्देमाल लंपास !

शिरूर तालुक्यात अवैध वीज वापर : गुन्हा दाखल !

शिरूर पोलिसांची धडक कारवाई : तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे व मोटारसायकल जप्त !

About The Author

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management) पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते. शिरूर (पुणे) येथील रहिवासी. सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत. 📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com

One thought on “शिरूर : 24 वर्षीय तरुणी बेपत्ता, शिरूर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद”

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत