शिरूर मधील ‘हातभट्टीच्या दारू’वर पोलिसांचा छापा; ९ लिटर दारूसह आरोपी पकडला!
शिरूरमधील इंदिरानगर येथील आरोपी राहणारा!
शिरूर, दि. १५ सप्टेंबर २०२५ |प्रतिनिधी |
“शिरूर पोलिसांनी बाबूरावनगर येथे छापा टाकून ९ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. संतोष तुकाराम पवार (वय 39) याला रंगेहाथ पकडून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल.”
शिरूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीणच्या मदतीने बाबूरावनगर येथील हद्दीत बाफनामळा लेबर कॅम्पजवळ छापा टाकून हातभट्टीच्या दारूची विक्री करणाऱ्या इसमाला रंगेहाथ पकडले.
➡️ गुन्हा नोंद : शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं 652/2025
➡️ कलम : महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई)
➡️ फिर्यादी : संजू ज्ञानदेव जाधव (पो. हवा ब.नं , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण
➡️ आरोपी : संतोष तुकाराम पवार (वय 39, रा. इंदीरानगर, ता. शिरूर, जि. पुणे)
कसा झाला छापा?—–
15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी संतोष पवार गावठी हातभट्टीची दारू विक्री करत आहे. ही माहिती मिळताच पोलीस हवालदार व्हि.एन. कोथळकर यांनी पंचांसमवेत छापा टाकला.
छाप्यात आरोपीकडे काळपट राखाडी कापडी पिशवीत ठेवलेल्या 500 मिली मापाच्या 18 पिशव्यांत भरलेली गावठी दारू आढळून आली. एकूण ९ लिटर दारू, अंदाजे किंमत ९०० रुपये, असा माल जप्त करण्यात आला.
जप्ती व तपास—–
दारूचा नमुना पंचासमक्ष घेत सी.ए. तपासणीसाठी पाठवण्यात आला. आरोपी संतोष पवार याला जागीच ताब्यात घेऊन त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
➡️ तपास अंमलदार : स.फौ. भोते
➡️ दाखल अंमलदार : पो. हवा व्हि.एन. कोथळकर
➡️ प्रभारी अधिकारी : श्री. संदेश केंजळे, सो. शिरूर पोलीस स्टेशन.
अधिक माहितीसाठी भेट द्या खालील संकेतस्थळांना••••
🔗 1. Maharashtra Prohibition Act – Government Portal
2. Pune Rural Police – Official Website
3. Alcohol Prohibition in India – Wikipedia
‘शिरुर न्युज’ च्या आणखीन बातम्या व लेख वाचा पुढील लिंकवर क्लिक करुन••••
शिरूरमध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत रामलिंग मधील तरुणाचा मृत्यू !
गणेशोत्सव निमित्ताने शिरूर शहरात साकारली आई तुळजाभवानी मातेची हुबेहूब प्रतिकृती !
शिरूरमध्ये मोटारसायकल चोरी : साई व्यंकटेश हायट्सच्या पार्किंगमधून होंडा Activa गायब
